Join us

खाद्यतेल महागणार?

By admin | Updated: October 28, 2014 01:38 IST

देशातील खाद्यतेल उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आयात करण्यात येणा:या खाद्यतेलाच्या किमतीवरील आयात शुल्कात वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेल उत्पादकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आयात करण्यात येणा:या खाद्यतेलाच्या किमतीवरील आयात शुल्कात वाढ करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. अर्थात, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा जरी दावा सरकारकडून होत असला तरी, आयातीचे प्रमाण जास्त असल्याने खाद्यतेलाच्या किमती महागण्याची शक्यता आहे. 
उपलब्ध माहितीनुसार, सध्या खाद्यतेलावर व अन्य प्रकारच्या तेलावर अडीच ते पाच टक्क्यांच्या आसपास शुल्क आकारले जाते; परंतु हे शुल्क पाच टक्के ते दहा टक्के वाढविण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. त्यामुळे वाढीव शुल्काची रक्कम ही ग्राहकांच्याच खिशातून वसूल केली जाईल, परिणामी या किमती महागण्याची शक्यता आहे.
 
च्भारतातर्फे इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांतून प्रामुख्याने खाद्यतेलाची आयात करण्यात येते. चालू वर्षात 19 दशलक्ष टन इतकी खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. देशाच्या एकूण खाद्यतेलाच्या प्रमाणात ही 6क् टक्के इतकी आहे. यावर्षीदेखील हे प्रमाण 18 ते 1क् दशलक्ष टनाच्या आसपासच असेल; परंतु आयात शुल्क वाढल्यास त्याचा फटका किंमत वाढीच्या रूपाने ग्राहकांना सोसावा लागेल.