Join us
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने फ्लिपकार्टला बजावली १ हजार कोटींची नोटीस

By admin | Updated: October 14, 2014 14:10 IST

फ्लिपकार्टने गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग सेल'ची अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टने गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या 'बिग सेल'ची अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली असून फ्लिपकार्टला एक हजार कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट रिटेल व्यवहार केल्याने फ्लिपकार्टने फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
गेल्या आठवड्याच फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे'ची ऑफर दिली होती, ज्यात अनेक प्रॉडक्ट्सवर सूट देण्यात आली होती. याविरोधात किरकोळ व्यापा-यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई करत फ्लिपकार्टला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
ई-कॉमर्स क्षेत्रात किरकोळ विक्रीवर बंदी असतानाही फ्लिपकार्टने सेलद्वारे किरकोळ विक्री केल्याचा आरोप ईडीतर्फे निश्चित करण्यात आला आहे. परदेशी सब्सिडीद्वारे फ्लिपकार्टने भारतात गुंतवणूक केली असून थेट परकीय गुंतवणूकीच्या माध्यमातून (एफडीआय) फ्लिपकार्टने १८ कोटी डॉलर्स  जमा केले आहेत.  मात्र, ई-कॉमर्सद्वारे मल्टीब्रांडमध्ये थेट परकीय गुंतवणूक जमा करणं हे फेमा कायद्याचे उल्लंघन मानलं जातं, असे ईडीतर्फे सांगण्यात आले आहे.