नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद करण्यासाठी तुलनात्मक आधार वर्षात बदल करण्यात आला असून, त्यामुळे २०१३-१४ सालाचा जीडीपी ११,७०० अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इंडिया रेटिंग्जच्या ताज्या अहवालात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. २०१२-१३ चा जीडीपी ९३,८९० अब्ज रुपये होता. आधार वर्ष बदलणे ही साधारण प्रक्रिया असून, बऱ्याच देशांत असे वर्ष बदलले जाते. इंडिया रेटिंग्जच्या म्हणण्यानुसार जीडीपी मोजण्यासाठी आधार वर्ष आता २०११-१२ आहे. त्यामुळे २०१३-१४ ची अर्थव्यवस्था ६ टक्के वाढली असून, १ लाख ११ हजार ७०० अब्ज रुपयांची (१८०० अब्ज डॉलर) झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदाद २००४-०५ हे आधार वर्ष मानून केली जात असे. इंडिया रेटिंग्जच्या म्हणण्यानुसार भारताची महसुली तूट २०१३-१४ सालात कमी झाली असून, ती जीडीपीच्या ४.३ टक्के होईल. २०१३-१४ मध्ये तो जीडीपीच्या ४.६ टक्के होती. तसेच कॅड (चालू तूट) जीडीपीच्या १.६ ते १.७ टक्का होईल, असा अंदाज आहे. या अंदाजाने २०१९-२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ३ हजार अब्ज डॉलरची होईल. आधार वर्ष २००४-०५ ठेवल्यास हा टप्पा २०२०-२१ मध्ये गाठला जाईल.
अर्थव्यवस्था १.११ लाख अब्ज रुपयांची
By admin | Updated: January 29, 2015 01:08 IST