Join us  

आर्थिक आघाडीवर अमेरिकेने भारताला दिला मोठा धक्का, या यादीत केला समावेश

By बाळकृष्ण परब | Published: December 17, 2020 11:23 AM

US-India News : आर्थिक आघाडीवर अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे.

वॉशिंग्टन - आर्थिक आघाडीवर अमेरिकेने भारताला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने भारताविरोधात कठोर भूमिका घेताना भारताचा समावेश चीन आणि तैवानसारख्या दहा देशांसह करन्सी मेनुपुलेटर्स म्हणजे चलनामध्ये फेरफार करणाऱ्या देशांमध्ये केला आहे. अमेरिकेरेने भारतासह ज्या दहा देशांचा या यादीत समावेश केला आहे. ते सर्व देश अमेरिकेचे व्यापारातील मोठे भागीदार आहेत.अमेरिकेने जाहीर केलेल्या या देखरेख यादीमध्ये भारत, चीन, तैवान या देशांसोबत जपान, दक्षिण कोरिया, जर्मनी, इटली, सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे. अमेरिकेने व्हिएटनाम आणि स्वित्झर्लंड यांना आधीच करन्स मेनुपुलेटर्सच्या यातीत टाकले होते. अमेरिकेच्या वित्त मंत्रालयाने बुधवारी काँग्रेसमध्ये सादर केलेल्या एका अहवालात ही माहिती दिली आहे.या अहवालात म्हटले आहे की, जून २०२० पर्यंतच्या आधीच्या चार तिमाहींमध्ये अमेरिकेच्या भारत, व्हिएटनाम, स्वित्झर्लंड आणि सिंगापूर चार प्रमुख व्यापारी भागीदार देशांनी आपल्या परकीय चलन विनिमय बाजारामध्ये हस्तक्षेप केला आहे. व्हिएटनाम आणि स्वित्झर्लंडने संभाव्य रूपात बाह्य असंतुलनाची ओळख केली आहे. ज्याचा प्रभाव अमेरिकेच्या प्रगतीवर पडला आहे. किंवा ज्यांनी अमेरिकेच्या कामगार आमि कंपन्यांचे नुकसान केले आहे.अमेरिकेचे वित्तमंत्री स्टिव्हन टी. म्युचिन यांनी सांगितले की, वित्तमंत्रालयाने अमेरिकी कामगार आणि व्यावसायिकांच्या आर्थिक विकास आणि संधींचे रक्षण करण्यासाठी एक भक्कम पाऊल उचलले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या परकीय चलन खरेदीत तेजी दिसून आली होती. त्याच प्रमाणे २०२०च्या पहिल्या सहामाहीमध्ये भारताने शुद्ध रूपात परकीय चलनाची खरेदी चालू ठेवली होती.

टॅग्स :व्यवसायभारतअमेरिका