Join us
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा बँकेतून विदेशात डॉलर पाठविण्यात ‘कमाई’

By admin | Updated: December 20, 2015 22:37 IST

बँक आॅफ बडोदाच्या येथील अशोक विहार शाखेचा वापर करून बेकायदेशीर मार्गांनी पैसा विदेशात पाठविणाऱ्या टोळीने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

नवी दिल्ली : बँक आॅफ बडोदाच्या येथील अशोक विहार शाखेचा वापर करून बेकायदेशीर मार्गांनी पैसा विदेशात पाठविणाऱ्या टोळीने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. या लोकांनी त्यांच्या सेवेचा वापरणाऱ्यांकडून परदेशात पाठविण्यात आलेल्या प्रत्येक डॉलरमागे १.३५ रुपये ‘शुल्क’ वसूल केले होते. बँक आॅफ बडोदाच्या अशोक विहार शाखेत सहा हजार कोटी रुपये (१०० कोटी डॉलर) हाँगकाँग आणि दुबईत पाठविण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) करीत आहे. या व्यवहाराच्या मुख्य सूत्रधाराने (मास्टर मार्इंड) त्याच्या माध्यमातून पैसा विदेशात पाठविण्यासाठी प्रत्येक डॉलरमागे १.३५ रुपये कमाई केली.