Join us

दिवाळी गिफ्टसाठी ई-कूपनला पसंती

By admin | Updated: November 9, 2015 00:50 IST

दिवाळी जवळ येताच भेट देण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. मिठाई आणि ड्रायफ्रूटस् देण्याऐवजी ज्याला भेट द्यायची आहे त्याला बाजारात जाऊन आपल्या

नवी दिल्ली : दिवाळी जवळ येताच भेट देण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. मिठाई आणि ड्रायफ्रूटस् देण्याऐवजी ज्याला भेट द्यायची आहे त्याला बाजारात जाऊन आपल्या आवडी व गरजेनुसार वस्तू घेण्यासाठी भेट म्हणून आॅनलाईन कूपन देण्यास पसंती मिळत आहे.पाईन लॅब्सचे सीईओ लोकवीर कपूर यांनी सांगितले की, डिजिटल गिफ्टिंग सोल्युशन्स केवळ नव्या कंपन्यांपुरतेच मर्यादित नाही तर मोठी उद्योग घराणीही आपल्या कॉर्पोरेट गिफ्टसाठी या माध्यमाचा वापर करीत आहेत. या अ‍ॅप्स आणि कूपन्सचा उपयोग कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर (कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोन) करता येतो.या क्षेत्रात अनेक कंपन्या सध्या काम करीत आहेत. आॅनलाईन कूपन भेट दिल्यानंतर दुकानात जाऊन आपल्या आवडीची कोणतीही वस्तू खरेदी करता येते. त्यामुळे हा ट्रेंड आता चांगलाच रुळला आहे. येणाऱ्या काही वर्षांत त्याचे चलन वाढेल. सॅमसंग, मॅक्स बुपा, मास्टर कार्ड, ब्रिटिश एअरवेज, एअरटेल, युनिव्हर्सल सोंपो आदी मान्यवर कंपन्याही आता गिफ्ट कूपनचे महत्त्व समजू लागल्या आहेत.