Join us  

मंदीवर मात करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना दिवाळी हंगामाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 3:25 AM

ग्रामीण भागांवर भिस्त : अनेक कंपन्यांचे असणार विक्री महोत्सव

बंगळुरू : या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या दिवाळी हंगामात मंदीवर मात करून चांगला व्यवसाय करण्याची अपेक्षा ई-कॉमर्स कंपन्यांनी व्यक्त केली आहे. ई-टेलर्स, ब्रँड्स, विक्रेते आणि विश्लेषक यांनी म्हटले की, येणाºया सणासुदीच्या हंगामात ग्रामीण भागातून चांगला व्यवसाय होऊ शकतो. मागील वर्षाच्या तुलनेत मात्र यंदाचा हंगाम कमीच राहील. वाहन आणि गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्रातील प्रचंड मंदीमुळे बाजार धास्तावलेला आहे. या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स क्षेत्रातून व्यक्त होणारी आशाही दिलासादायक आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी फ्लिपकार्टने २९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या काळात ‘बिग-बिलियनडेज’ या नावाने विक्री महोत्सव आयोजित केला आहे. वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने यासंबंधीच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. अ‍ॅमेझॉनने अद्याप आपल्या विक्री महोत्सवाची अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, दोन्ही कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक असल्यामुळे अ‍ॅमेझॉनचा विक्री महोत्सवही याच तारखांना असेल यात शंका नाही. अ‍ॅमेझॉनचे उपाध्यक्ष मनीष तिवारी यांनी सांगितले की, मागील दोन सेल्समध्ये कंपनीला कोणतीही मंदी आढळून आली नाही. यंदाच्या हंगामातही विक्री दुपटीने वाढेल, अशी आम्हाला आशा आहे. दिवाळी हंगामात आम्ही काही नवी उत्पादने बाजारात उतरवीत आहोत. त्यांना उठाव आढळून आला नाही, तर आणखी नवी उत्पादने आणली जाणार नाहीत. (वृत्तसंस्था)विक्रीत २0 टक्के वाढ अपेक्षितफॉरेस्टर आणि रेडसीअर यासारख्या बाजार संशोधक संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी दिवाळी हंगामात ई-कॉमर्स विक्री ३३ टक्क्यांनी वाढून २ ते २.३ अब्ज डॉलरवर गेली होती. फॉरेस्टरचे वरिष्ठ विश्लेषक सतीश मीना यांनी सांगितले की, यंदा विक्रीत २० टक्के वाढ होऊ शकेल. रेडसीअरने म्हटले की, यंदाही गेल्या वर्षीएवढीच विक्री वाढ अपेक्षित आहे. 

टॅग्स :अर्थव्यवस्थाव्यवसायअ‍ॅमेझॉन