Join us

पुण्यात विसर्जनावेळी तिघे पाण्यात वाहून गेले

By admin | Updated: September 2, 2014 22:40 IST

पिंपरी-चिंचवड : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीपात्रात वाहून बेपत्ता झाल्याची घटना देहूरोडजवळील शेलारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

पिंपरी-चिंचवड : गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण नदीपात्रात वाहून बेपत्ता झाल्याची घटना देहूरोडजवळील शेलारवाडी येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
अभिजीत दत्तप्रसाद सोनवणे (21, रा. इंद्रायणीदर्शन, देहूरोड), कुणाल वाल्मीकी (18, रा. देहूरोड), प्रवीण चंडालिया (20, रा. पारशी चाळ, देहूरोड) अशी त्यांची नावे आहेत. आनंद सुरेश भिल (रा. पारशी चाळ) याला वाचविण्यात यश आले. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौघेही तरुण आधार खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आहेत. रुग्णालयात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणरायाचे विसर्जनासाठी चौघेही शेलारवाडीतील स्मशानभूमीजवळील नदीघाटावर गेले होते. विसर्जनानंतर ते नदीपात्रात पोहत होते. (प्रतिनिधी)
----------