Join us  

एसव्हीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून दुर्गेश चंदावरकर यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:49 AM

एसव्हीसी बँकेने (एसव्हीसी सहकारी बँक लि.) 24 जुलै 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून दुर्गेश एस. चंदावरकर यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देएसव्हीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून दुर्गेश एस. चंदावरकर यांची निवडविनोद जी. येन्नेमडी यांचे 20 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाल्याने त्यांच्या जागी चंदावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंदावरकर हे उद्योजक असून त्यांना विविध उद्योगांचा 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे.

मुंबई- एसव्हीसी बँकेने (एसव्हीसी सहकारी बँक लि.) 24 जुलै 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून दुर्गेश एस. चंदावरकर यांची निवड केल्याचे जाहीर केले आहे. विनोद जी. येन्नेमडी यांचे 20 जुलै 2019 रोजी दुःखद निधन झाल्याने त्यांच्या जागी चंदावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. “चंदावरकर हे उद्योजक असून त्यांना विविध उद्योगांचा 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे. येन्नेमडी यांच्या अनुपस्थितीत आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची निवड अतिशय योग्य आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामाची गती यापुढेही कायम ठेवण्यासाठी व आमच्या संस्थापकांची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”एसव्हीसी बँकेचे अध्यक्ष दुर्गेश एस. चंदावरकर यांनी सांगितले की, “येन्नेमडी यांच्या नेतृत्वाखाली 22 जून 2018 रोजी माझी निवड एसव्हीसी बँकेच्या संचालक मंडळावर झाली. अन्य उद्योगांत जेथे ते संचालक मंडळाचा भाग होते, तेथे मी त्यांना काम करताना जवळून पाहिले आहे. त्यांनी ज्या ज्या कंपन्यांना मार्गदर्शन केले तेथे त्यांची दूरदृष्टी, त्यांची कृती योजना, त्यांचे व्यक्तिमत्त्व यांचा माझ्यावर प्रभाव पडला आहे आणि त्यामुळे त्यांची अनुपस्थिती जाणवणार आहे. अध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी एसव्हीसी बँकेच्या संचालक मंडळाचा आभारी आहे. त्यांनी रुजवलेली परंपरा आम्ही संचालक मंडळाचे प्रयत्न व एसव्हीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे कायम राखू शकू.”

दुर्गेश चंदावरकरही अनेक कंपन्यांशी जोडलेले आहेत. ते स्टँडर्ड ग्रीसेस अँड स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत, रॉयल कास्टर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे अध्यक्ष आहेत आणि ऍस्ट्रम हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, स्टँडर्ड ऑइल्स अँड ग्रीसेस प्रायव्हेट लिमिटेड, टाइज वॉटर ऑइल कं. (इंडिया) लि. व यूकेतील वीडोल इंटर्नल लिमिटेड येथे संचालक आहेत. ते जेथे विश्वस्त आहेत अशा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ते विविध कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रकल्पांत सक्रिय कार्यरत आहेत.

टॅग्स :बँक