नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सुस्ती आणि मागणी रोडावल्याने दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली.दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १०० रुपयांनी कमी होत दिवसअखेर २५,१३० रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम), तर चांदीचा भाव ४५० रुपयांनी घसरत ३३,७५० रुपयांवर (प्रति किलो) आला. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह सप्टेंबरच्या सुरुवातीला व्याजदर वाढविण्याची शक्यता असल्याने या मौल्यवान धातूवरील दडपण वाढले.सिंगापूर सराफा बाजारातील घडामोडीवरून भारतीय सराफा बाजाराची दिशा ठरत असते. सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी कमी होत प्रति औंस १,०८३.७८ डॉलरवर, तर चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी घसरत प्रति औंस १४.४९ डॉलरवर होता. याशिवाय आभूषण निर्माते आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडूनही फारसा उठाव नसल्याने सोने आणि चांदीचे भाव उतरले.
मागणी सुस्तावल्याने सराफ्यात मंदी
By admin | Updated: August 4, 2015 23:13 IST