Join us

उच्च दाब विद्युतवाहिनीच्या खांबावर दारुड्याचा प्रताप

By admin | Updated: December 3, 2014 00:23 IST

आत्महत्त्या करण्याची धमकी : पोलिसांना धरले वेठीस

आत्महत्त्या करण्याची धमकी : पोलिसांना धरले वेठीस
इंदिरानगर : पाथर्डी फाटा चौफु लीवर उच्च दाब विद्युतवाहिनीच्या खांबावर चढून आत्महत्त्या करण्याची धमकी देत दारुड्याने रात्री उशिरापर्यंत पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रकार रात्री नऊ वाजता घडला़
खांबावर चढलेल्या व्यक्तीचे नाव दीपक तुळशीराम मोरे, रा़ पाथर्डी फाटा असे असल्याचे पोलिसांनी सांगितले़ त्याची याच भागात चहाची टपरी असून, त्यास पत्नी तसेच दोन मुले आहेत़ त्याने टपरी बंद केल्यानंतर तो रात्री खूप दारू प्याला व पाथर्डी फाटा चौफुलीवरील उच्च दाब विद्युतवाहिनीच्या खांबावर चढून मोठ्याने ओरडत आपण आत्महत्त्या करणार असल्याचे सांगू लागला़ नागरिकांचे त्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याला कळवले़ इंदिरानगर पोलीस तसेच अग्निशामक दलाने तिकडे धाव घेतली़ परंतु सुमारे तासभर मोरे याने मी खाली उडी मारून आत्महत्या करेल, अशा धमक्या देत राहिला, तर अग्निशामक दलाचे कर्मचारी शिडीने वर जाण्याचा प्रयत्न करताच तो तारांच्या दिशेने जास्त वरती जाण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्वांचा नाइलाज झाला होता़ रात्री बारा वाजता त्यास सुखरूप खाली उतरविण्यात अखेर अग्निशामक दलास यश आले़