Join us

दार्जिलिंग चहावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: May 23, 2014 01:36 IST

दार्जिलिंगमधील सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रीमियम फर्स्ट फ्लश चहा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला,

कोलकाता : दार्जिलिंगमधील सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रीमियम फर्स्ट फ्लश चहा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला,अशी माहिती येथील प्रमुख उत्पादकांनी दिली. एन्ड्र्यू यूलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कल्लोल दत्ता म्हणाले की, दार्जिलिंगच्या बहुतांश भागात पावसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे फर्स्ट फ्लश चहाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. दार्जिलिंगच्या एकूण चहा उत्पादनापैकी फर्स्ट फ्लश चहाचा वाटा १० टक्के एवढा असतो; परंतु यावेळी अधिकांश उत्पादकांना यापासून दूर राहावे लागणार आहे. दुष्काळाच्या सावटाने जवळपास ३० टक्के चहा उत्पादन प्रतिकूल परिस्थितीत आहे. जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान सुधारणांचे संकेत आहेत, असेही दत्ता म्हणाले. (वृत्तसंस्था)