नवी दिल्ली : महागाई मोठ्या प्रमाणात घटल्याने या महिन्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात करण्यास रिझर्व्ह बँकेपुढे मोठा वाव असल्याचे जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी म्हटले आहे.वित्तीय सेवा क्षेत्रातील मुख्य कंपन्या एचएसबीसी, डीबीएस, बँक आॅफ अमेरिका, मेरिल लिंच आणि स्टेट बँक आॅफ इंडिया यांनी हा आशावाद व्यक्त केला आहे.या महिन्यात रिझर्व्ह बँक द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. त्यात मुख्य व्याजदरात किमान ०.२५ टक्के कपात केली जाईल, असे या वित्तीय संस्थांना वाटते.
महागाई घटल्याने व्याजदर कपातीस मोठी संधी
By admin | Updated: September 16, 2015 02:13 IST