Join us

राज्यातील डाळ उद्योगावर अवर्षणाचे ढग !

By admin | Updated: June 26, 2014 00:34 IST

डाळ उद्योगात देशभर आपला ब्रँड निर्माण केलेल्या लातूरच्या उद्योजकांना यंदा मान्सूनचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

चेतन धनुरे - लातूर
डाळ उद्योगात देशभर आपला ब्रँड निर्माण केलेल्या लातूरच्या उद्योजकांना यंदा मान्सूनचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.  जिल्ह्यात वार्षिक सरासरी 45 ते 5क् लाख क्विंटल डाळीचे उत्पादन होते. यंदा यात  3 लाख क्विंटल घट होण्याची भीती डाळ उद्योगातून व्यक्त होत आहे. 
लातूर जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांची मोठी चलती होती. त्यामुळे या ठिकाणी डाळ उद्योग चांगलाच विकसीत झाला आहे. परंतु, पावसाच्या अनिश्चिततेमुळे 15 वर्षापूर्वीर्पयत मोठय़ा प्रमाणात पिकविल्या जाणा:या मूग, उडीदाची जागा आता सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे डाळीच्या उद्योगाची भिस्त पूर्णपणो तूर व हरभ:यावर अवलंबून राहिली आहे. 
यावर्षी लातूरसह कर्नाटकच्या सीमावर्ती भागातही अद्याप पावसाने दडी मारली असल्याने जूनअखेरही पेरणी झाली नाही. तुरीच्या पेरणीस विलंब झाल्यास उत्पादनात घट होते, असा शेतक:यांचा अनुभव आहे. साधारणत: पेरणी 5 जुलैनंतर झाल्यास उत्पादनात जवळपास 1क् टक्के घट येते, अशी माहिती तूर उत्पादक शेतक:यांनी दिली. त्यामुळे डाळीच्या उत्पादनातही जवळपास 
3 लाख क्विंटलची घट होण्याची 
भीती डाळ उद्योजक व्यक्त करीत आहेत. 
लातूर जिल्ह्यातून जवळपास 45 लाख क्विंटल डाळ उत्पादित केली जाते. त्यामुळे डाळीची बाजारपेठ बहुतांशी लातूरवर अवलंबून आहे. यंदा उशिरा पेरण्या झाल्यास घटणा:या शेतमालाप्रमाणो डाळ उत्पादनही घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रसिद्ध डाळ उद्योजक गट्टसेठ अग्रवाल यांनी सांगितले.
 
4लातूरमध्ये 85 तर उदगीरमध्ये 4क् डाळ मिल आहेत. या मिल्सच्या माध्यमातून दररोज सरासरी 15 हजार क्विंटल तूर व हरभरा डाळींचे उत्पादन घेतले जाते. त्यातही तुरीचाच अधिक वाटा आहे.
4जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टर्स क्षेत्रवर तूर तर साडेतीन लाख हेक्टर्सवर हरभ:याची लागवड केली जाते. त्यातून अनुक्रमे 25 व 35 लाख क्विंटल तूर व हरभ:याचे उत्पन्न शेतक:यांच्या पदरी पडते.
4 याशिवाय, कर्नाटकच्या सीमावर्ती भागातूनही मोठय़ा प्रमाणात तूर-हरभ:याची लातूर-उदगीरच्या बाजारपेठेत आवक होते. या दोनच ठिकाणी डाळ उद्योग मोठय़ा प्रमाणात विकसीत झाला आहे.  
 
जालन्यातील दालमिल संकटात
संजय कुलकर्णी ल्ल जालना 
गेल्यावर्षी भीषण दुष्काळ व त्यापाठोपाठ अतिवृष्टी यामुळे पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील दालमील बाजार थंडच आहे. उत्पादनातील घट तसेच डाळींचा दर्जाही काही अंशी घसरल्याने दालमील उद्योग सद्यस्थितीत अडचणीत असल्याचे शहरातील उद्योजकांनी सांगितले.
जिल्ह्यात सुमारे 3क् डाळमील आहेत. त्यापैकी 25 मील जालना शहरातच आहेत. गेल्या 3क्-4क् वर्षापासून जालन्यातील डाळमील उद्योग मराठवाडय़ात प्रसिद्ध आहे. येथील डाळींचा माल महाराष्ट्रात विविध भागांत जातो. मूगडाळीचा सीझन ऑगस्टमध्ये, तुरीचा डिसेंबर, तर हरभरा डाळीचा सीझन फेब्रुवारी महिन्यात असतो. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकरी मोठय़ा 
प्रमाणात डाळी या बाजारात विक्री करतात. 
फेब्रुवारी ते मे 2क्13 या कालावधीत जिल्ह्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती होती. त्यामुळे शेतक:यांची पिके आलीच नाहीत. त्याचा मोठा फटका डाळमील उद्योगालाही बसला. जून ते सप्टेंबर 2क्13 या काळात जिल्ह्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे डाळीचे उत्पादन घटले. तर काही भागात डाळींचा दर्जा घसरला. 
दहा मिल बंद
गेल्या वर्षभरापासून दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका शेतक:यांप्रमाणोच डाळमील उद्योगाला बसला. याबाबत उद्योजक अमित मगरे म्हणाले की, मागील वर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. जो माल येतो, त्यातही काहींचा दर्जा घसरलेला आहे. वर्षभरात 1क् मील तर बंदच होत्या.