Join us

‘स्मार्ट सिटी’साठीचा मसुदा फेब्रुवारी अखेरपर्यंत

By admin | Updated: January 29, 2015 23:56 IST

: देशात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत तयार होईल.

मुंबई : देशात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत तयार होईल. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी १०० शहरांची निवड येत्या दोन दिवसांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती केंद्रीय शहरी विकास सचिव शंकर अग्रवाल यांनी दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.अग्रवाल यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी शहर निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आम्ही सध्या दिशानिर्देशांवर कार्यरत आहोत आणि यासाठीचा मसुदा २८ फेब्रुवारीपर्यंत तयार होईल. सरकार तंत्रज्ञानावर आधारित प्रशासन असलेली शहरे विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. या आधुनिक शहरांत चोवीस तास पाणी व वीज उपलब्ध असेल. या शहरांचा पायाभूत आराखडा अत्याधुनिक असेल व सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा येथे असतील. सार्वजनिक खासगी भागीदारीच्या आधारे या शहरांचा विकास करण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी प्रत्येक शहरासाठी आगामी दहा वर्षांत सरासरी १,००० कोटी रुपयांची गुंतवणुकीची गरज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)