Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांच्या विरोधात ठराव घेऊ नका! नागरिकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

अकोला: मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी निलंबनाचा ठराव घेण्याची तयारी केली असतानाच, उमरी परिसरातील नागरिकांनी नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध केला. चिंचोलीकर यांच्या विरोधात ठराव घेऊ नका, अशी मागणी करीत सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

दुकानांचे नामफलक काढण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांचा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्यासोबत वाद झाला. वाद चिघळल्याने चिंचोलीकर यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. उपायुक्त चिंचोलीकर यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे अतिक्रमणाची समस्या दूर झाली असून, सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी झाल्याचे उमरी परिसरातील नागरिकांचे मत आहे. प्रामाणिक अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई योग्य नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत अमोल नावकार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

-फोटो-२सीटीसीएल-२५-