Join us

‘गरिबांच्या पैशावर संसार थाटू नका’

By admin | Updated: November 17, 2014 03:19 IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन सूक्ष्म वित्त कंपन्यांना आपल्या कारभाराला स्थैर्य देण्यासाठी केवळ ‘उचित नफा’ कमावण्याचे आवाहन केले

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन सूक्ष्म वित्त कंपन्यांना आपल्या कारभाराला स्थैर्य देण्यासाठी केवळ ‘उचित नफा’ कमावण्याचे आवाहन केले. गरिबातील गरीब व्यक्तीला सेवा देताना त्यांच्याकडून नफा कमावण्याचा विचार करू नये, असे ते म्हणाले.येथे एका कार्यक्रमात बोलताना राजन पुढे म्हणाले, प्रल्हाद यांनी पिरॅमिडच्या खालच्या पातळीवरून भविष्याला स्थैर्य देण्याचे सांगून समाजाची सेवा केली नाही. चांगल्या नियतीने आपण गरिबाकडून नफा कमावण्याचा विचारच करू शकत नाही; मात्र अशा पद्धतीने तुम्ही भविष्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न करीत असाल तर समाजातून नफा कमावण्याच्या पद्धतीस सवाल केले जातील. (प्रतिनिधी)