Join us

करदात्यांना अकारण त्रस देऊ नका

By admin | Updated: November 12, 2014 01:47 IST

प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांची चौकशी होत असताना मित्रत्वाचे वातावरण निर्माण व्हावे आणि चुकीचे मूल्यांकन होऊ नये,

सीबीडीटी : प्राप्तिकर खात्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी
नवी दिल्ली : प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांची चौकशी होत असताना मित्रत्वाचे वातावरण निर्माण व्हावे आणि चुकीचे मूल्यांकन होऊ नये, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ -सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस -(सीबीडीटी) कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. करदात्यांना अकारण त्रस देऊ नये. नोटिसा पाठविण्यापूर्वी करदात्याच्या संबंधित प्रकरणाची नीट छाननी करूनच नोटिसा पाठवाव्यात, असे सूचित करण्यात आले आहे.
सीबीटीडी हे प्राप्तिकर खात्याचे धोरण ठरविणारे मंडळ आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच प्राप्तिकर खात्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी करप्रणालीबाबत नकारात्मक चित्र निर्माण होऊ नये, असे मत व्यक्त केले होते. त्याला अनुसरून ही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. समन्स बजावण्याबाबत करदात्यांच्या सातत्याने तक्रारी असतात. याबाबत आवश्यक अशा प्रकरणांतच समन्स बजावण्यात यावे, असे मंडळाने म्हटले आहे. संबंधित यंत्रणोने याबाबत खात्री झाल्यानंतरच हे समन्स बजावण्यात यावे, असे मंडळाचे म्हणणो आहे.