Join us  

दिवाळी सेल ! या स्मार्टफोन्स, लॅपटॉप्सवर मिळतेय 20 हजाराची बंपर सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 1:40 PM

सणासुदीच्या काळात जवळपास सर्वच इ-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेगा सेल घेवून आल्या आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना भरमसाठ सूट देण्यासोबतच अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत.

मुंबई, दि. 21 - सणासुदीच्या काळात जवळपास सर्वच इ-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेगा सेल घेवून आल्या आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना भरमसाठ सूट देण्यासोबतच अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. 20 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर  ‘बिग बिलियन डेज’चा सेल सुरू झाला आहे. तर अॅमेझॉन इंडियावरही ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल’सेलला सुरूवात झाली आहे. याशिवाय स्नॅपडीलनेही ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी दिवाळी सेल सुरू केला आहे. 25 सप्टंबरपर्यंत हे सेल सुरू असणार आहेत. 

याशिवाय फॅशन आणि लाइफस्टाइमध्ये 500 ब्रॅंडच्या वस्तूंवर याआधी कधीच नाही, अशी ऑफर आहे. तसेच लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू जशा की डीएसएलआर कॅमे-यासोबत मोफत गिफ्ट, प्रिंटर्सवर एक्सचेंग ऑफर आहे. याबरोबर, अॅपल आयपॅड ईएमआयवर घेता येऊ शकेल, अशी सुविधा ग्राहकांना देण्यात आली आहे. टीव्ही, फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन या वस्तूंवर जवळपास 70 टक्के सवतल देण्यात आली आहे.  तर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर 70 हजार रुपयापर्यंतची सवलत देण्यात आली आहे. 

कोणत्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर आहे बंपर सूट - - iPhone 7 च्या 32GB व्हॅरिअंटची मूळ किंमत 56 हजार 200 रुपये आहे, पण सेलमध्ये तुम्हाला हा फोन 38 हजार 999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.  

-    iPhone 7 Plus च्या 128GB व्हॅरिअंटची मूळ किंमत 76 हजार 200 रुपये आहे, पण सेलमध्ये तुम्हाला हा फोन 59 हजार 999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे.  -    iPhone 6 च्या 32GB व्हॅरिअंटची मूळ किंमत 29 हजार 500 रुपये आहे, पण सेलमध्ये तुम्हाला हा फोन 20 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. -    iPhone SE च्या 32GB व्हॅरिअंटची मूळ किंमत 26 हजार रुपये आहे, पण सेलमध्ये हा फोन 17 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. -    iPhone 5S केवळ 16,400 रुपयांना  खरेदी करण्याची संधी आहे.  -    Samsung Galaxy S7 ची मूळ किंमत 46 हजार 000 रुपये आहे, पण हा फोनही   29 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे.  - Huawei P9 ची मूळ किंमत 39 हजार 999 रुपये आहे पण सेलमध्ये तुम्हाला हा फोन केवळ 14 हजार 999 रूपयांना खरेदी करण्याची संधी आहे.  -    Samsung Galaxy S8 ची मूळ किंमत 57 हजार 900 रुपये आहे, पण सेलमध्ये तुम्हाला हा फोन  53 हजार 900 रुपयांना खरेदी करता येईल. 

-    Apple MacBook Air Core i5 5th Gen – ची मूळ किंमत 58 हजार 990 रुपये आङे, पण सेलमध्ये याची किंमत 44 हजार 990 रुपये आहे. 

-    Moto Z Play ची मूळ किंमत 24,999 रुपये आहे, पण सेलमध्ये याची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. 

-    Lenovo K8 Plus : या स्मार्टफोनची मूळ किंमत 10 हजार 990 रुपये आहे, पण सेलमध्ये  8,990 रुपयांना हा फोन उपलब्ध आहे.  

-    Acer Predator Helios Core i7 7th gen. याची मूळ किंमत जवळपास 1 लाख रुपये आहे, पण सेलमध्ये याची किंमत केवळ 60 हजार रुपये      आहे. 

-    HP Core i5 6th जनरेशन ची मूळ किंमत 27,490 रुपये आहे. पण सेलमध्ये याची किंमत  21,990 रुपये आहे.