Join us  

Diwali Bonus: तुम्हालाही दिवाळी बोनस मिळालाय? ‘अशी’ करा गुंतवणूक; होईल मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 3:52 PM

Diwali Bonus: तुम्ही तुमच्या बोनसचा योग्य वापर केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मुंबई: दिवाळी अवघे काही दिवस राहिले आहेत. सणासुदीच्या काळात अनेकजण मोठी खरेदी करत असतात. तर काहीजण शुभ मुहुर्तावर काही ना काही गुंतवणूक करत असतात. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) देतात. वर्षभरातून एकदा मिळालेला बोनस काही लोक खर्च करतात, तर काही जण त्या पैशांचा वापर नातेवाइकांना भेटवस्तू देण्यासाठी वापर करतात. परंतु, काही जण ते पैसे गुंतवतात किंवा विशिष्ट हेतूसाठी बाजूला ठेवतात. दिवाळी बोनसचे पैसे योग्य पद्धतीने गुंतवल्यास त्यातून तुम्हाला भरपूर फायदाही मिळू शकतो. 

तुम्ही तुमच्या बोनसचा योग्य वापर केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही दिवाळी बोनस कसा आणि कुठे वापरू शकता. तुम्ही पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन किंवा अल्प मुदतीचे कर्ज घेतले आहे, ज्याचे व्याजदर जास्त आहेत, तर तुमचा बोनस वापरण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरेल. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही हा निधी वापरू शकता. कर्जाचा काही भाग भरल्याने तुमचे ओझे कमी होऊ शकते.

योग्य प्रमाणात विमा संरक्षण आवश्यक

कोरोना संकटामुळे बर्‍याच लोकांना उत्तम आरोग्य विमा संरक्षणाचे महत्त्व समजले आहे. तर काही लोक जास्त प्रीमियममुळे आरोग्य विमा खरेदी करत नाहीत. इतर उच्च प्रीमियम दरांमुळे कमी कव्हरसह सर्वसमावेशक फॅमिली फ्लोटर आरोग्य योजना खरेदी करतात. अशा परिस्थितीत टॉप-अप किंवा सुपर टॉप-अप हेल्थ प्लॅन तुम्हाला अधिक कव्हर मिळवण्यास मदत करू शकतात. तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणारे योग्य प्रमाणात विमा संरक्षण आवश्यक आहे, असे सांगितले जाते. 

योग्य पद्धतीने गुंतवणूक योजनेत गुंतवा पैसे

म्युच्युअल फंड योजनांमध्ये नियमित, दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन - एसआयपी) एक लोकप्रिय रणनीती स्ट्रॅटेजी आहे. एसआयपीसह आपण नियमित अंतराने म्युच्युअल फंड योजनांमध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता. एसआयपीमध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. बाजारातील अस्थिरता घेता धोका पत्करायचा नसेल, तर एसआयपी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे, असे सांगितले जाते. इक्विटीमध्ये एसआयपी सुरू केल्यास दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळू शकतो, असे सांगितले जाते.  

टॅग्स :दिवाळी 2021गुंतवणूकव्यवसाय