दिव्याखाली अंधार, मनपाच्या मानसेवी-जोड बातमी २
By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST
बॉक्स...
दिव्याखाली अंधार, मनपाच्या मानसेवी-जोड बातमी २
बॉक्स...खासगी भूखंडांवर अतिक्रमणबिर्ला रोडलगतच्या काही खासगी भूखंडांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण थाटले आहे. टिनाच्या झोपड्या उभारून त्यांचा वापर शेळ्या-मेंढ्या, म्हैस आदींसाठी होत असल्याचे समोर आले आहे. गुरांचे शेण उघड्यावर टाकल्या जात असल्याने परिसरातील रहिवासी व एका महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा प्रकार अतिक्रमण विभागाचे विष्णू डोंगरे यांच्या नजरेतून कसा सुटला, यावर उलट सुलट चर्चेला ऊत आला आहे. बॉक्स....पक्की घरे असतानाही कब्जाबिर्ला रोडलगत खासगी भूखंड तसेच रस्त्यांवर अतिक्रमित घरे उभारणार्या काही अतिक्रमकांची न्यू तापडिया नगरमध्ये पक्की घरे असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. खासगी भूखंडावरून हटण्यासाठी संबंधित जागा मालकाकडून मोठी रकम उकळण्याचा संबंधित अतिक्रमकांचा व्यवसाय बनला असून, या प्रकाराला काही बिल्डर व जागा मालक बळी पडल्याची माहिती आहे.