Join us

कर्मचार्‍यांसाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र महसूल दिन: विविध उपक्रम सुरू करण्याची जिल्हाधिकार्‍यांची माहिती

By admin | Updated: August 3, 2014 00:48 IST

अहमदनगर: कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी निंबळक येथे जिल्हा प्रशिक्षण केंद्राची इमारत उभारण्यात येणार असून, कर्मचार्‍यांसाठी चार प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़ जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़

अहमदनगर: कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी निंबळक येथे जिल्हा प्रशिक्षण केंद्राची इमारत उभारण्यात येणार असून, कर्मचार्‍यांसाठी चार प्रकारच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली़ जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़महसूल दिनानिमित्त सुरू करण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली़ त्यावेळी ते बोलत होते़ उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते़ नव्याने येणार्‍या तंत्रज्ञानाची कर्मचार्‍यांना माहिती व्हावी, यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे़ निंबळक येथे केंद्र उभारण्यात येणार आहे़ यामध्ये चार प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल़ येत्या ४ ते ७ ऑगस्टपर्यंत तलाठी वर्गासाठी कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम येथे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे़ प्रशिक्षण ही निरंतर प्रक्रियाच सुरू करण्यात येत असून, निंबळक येथील इमारतीचेही काम सुरू होणार आहे, असे कवडे म्हणाले़ नागरिकांना विविध दाखल्यांसाठी कार्यालयात यावे लागते़ त्यात सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो़ नागरिकांना कार्यालयात येण्याची वेळ येणार नाही,यासाठी विविध उपक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे़ त्यांना जागेवरच सुविधा उपलब्ध के ल्या जाणार आहेत़ प्रत्येक तालुक्यात शिबिरे घेऊन रेशनकार्डसह इतर दाखल्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती कवडे यांनी यावेळी दिली़़़़असे आहेत उपक्रमअभिलेखांचे स्कॅनिंग़़निस्तार पत्रक व वाजिब उल अर्ज तयार करणे़़प्रत्येक तालुक्यात रेशनकार्ड वाटप शिबिरे़़राजस्व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी़़जमावबंदी आदेशानंतर ई- म्युटेशन सुरू करणाऱ़़सेतू केंद्रात १० सेवा ऑनलाईन करणाऱ़भूसंपादन झालेल्या भूमिहीनांना शेतकर्‍याचा दर्जा़़़नवीन उपक्रम सुरू करणारफेरफार अदालतचावडी वाचनरस्त्यांचे वाद दोन महिन्यांत सोडविणाऱ़़कुळकायदा कलम ४३ नुसार नियंत्रित सत्ताज्यांना कुळ कायद्याने जमीन मिळालेली आहे आणि ज्यांच्याकडे २००४ पूर्वीचे ३२ एम प्रमाणपत्र असेल, अशा सर्व शेतकर्‍यांनी ४० पट शेतसारा भरून जमिनी नावावर करून घ्यावात़ त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे़़़