औद्योगिक वसाहतीमधील २०० एकर भूखंडांचे वाटप रद्द मूर्तिजापूर विकास केंद्राचा मार्ग मोकळा : अमरावतीच्या प्रादेशिक अधिकार्याची कारवाई
By admin | Updated: June 12, 2015 17:38 IST
गणेश मापारी
औद्योगिक वसाहतीमधील २०० एकर भूखंडांचे वाटप रद्द मूर्तिजापूर विकास केंद्राचा मार्ग मोकळा : अमरावतीच्या प्रादेशिक अधिकार्याची कारवाई
गणेश मापारी मूर्तिजापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने भूखंडांचे वाटप केल्यानंतर विहित मुदतीत करारनामा पूर्ण न करण्यासोबतच अटींचे पालन न केल्याने मूर्तिजापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील २०० एकर भूखंडाचे वाटप रद्द करण्यात आले आहे. सदर २०० एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाचे एकाच नामवंत कंपनीला वाटप करण्यात आले होते, हे विशेष.मूर्तिजापूर विकास केंद्रातील भूखंड क्रमांक ए-४८ मधील ५,२४,०१३.५० चौरस मीटर तसेच ए-४ मधील २,७६,०२३.७५ चौरस मीटर म्हणजेच २०० एकर क्षेत्रफळाच्या जमिनीचे वाटप ११ जुलै २००८ रोजी मे.ॲपेक्स रीअल इस्टेट लि. या मुंबई येथील कंपनीला उद्योग उभारण्याकरिता करण्यात आले होते. सदर कंपनीला जमिनीचा ताबा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करारनामा तयार केला; परंतु कंपनीने सदर करारनामा टंकलिखित केला नाही. त्यासोबतच यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाला काहीही प्रतिसाद दिला नाही. त्याचप्रमाणे वाटप केलेल्या जमिनीवर इमारत उभारून उद्योग सुरू करण्याकरिता व बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कंपनीला १० जुलै २०१३ ची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत कंपनीने कोणताही उद्योग उभारला नाही. त्यामुळे सदर भूखंडाचे ॲपेक्स कंपनीला केलेले वाटप रद्द करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अमरावती येथील प्रादेशिक अधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली.दरम्यान, मूर्तिजापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात उद्योग उभारण्यासाठी भूखंडच शिल्लक नाही. त्यामुळे संबंधित २०० एकराच्या भूखंड वाटपाबाबत नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. परिणामी, मूर्तिजापूर विकास केंद्राचा मार्ग आता मोकळा झाला असून, या ठिकाणी उद्योग उभारण्यास चालना मिळणार आहे.इन्फो बॉक्स ५२ रुपये चौरस मीटर भावाने भूखंडाचे वाटप राज्यात नवनवीन उद्योग उभारले जावेत तसेच स्थानिक नागरिकांना, कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने एमआयडीसी परिसरात अल्प दराने भूखंडवाटप करण्याचे धोरण अबलंबिले आहे. मूर्तिजापूर येथील २०० एकराच्या भूखंडाचे वाटप २००८ मध्ये केवळ ५२.५० रुपये चौरस मीटर या दराने करण्यात आले होते. ००००००००००० जोड आहे.