Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मीडियातील ड्रामामुळे लक्ष विचलित’

By admin | Updated: February 14, 2017 23:45 IST

इन्फोसिसबाबत मीडियात सुरू असलेल्या ड्रामामुळे लक्ष विचलित होत आहे, पण यावर योग्य मार्ग काढायला हवा

नवी दिल्ली : इन्फोसिसबाबत मीडियात सुरू असलेल्या ड्रामामुळे लक्ष विचलित होत आहे, पण यावर योग्य मार्ग काढायला हवा, असे मत मुख्य कार्यकारी विशाल सिक्का यांनी व्यक्त केले आहे. इन्फोसिसच्या सहसंस्थापकांशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. नारायणमूर्ती, नंदन नीलकेणी आणि कृष गोपालन यांनी कंपनीबाबत काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर, प्रथमच सिक्का यांनी हे मत व्यक्त केले आहे. कंपनी एका मजबूत आधारावर टिकून आहे, असेही ते म्हणाले. नारायणमूर्ती यांच्यासोबतच्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले की, माझे त्यांच्याशी अतिशय आत्मिक, खूप चांगले संबंध आहेत. अन्य संस्थापकांसोबतही आपले चांगले संबंध आहेत.