Join us

वीज पुरवठा खंडित; पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले पाणीपुरवठा एक दिवसाने समोर

By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. परिणामी शहर पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला असून, एक दिवसाने तो समोर ढकलण्यात आल्याची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाच्यावतीने देण्यात आली.

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा गुरुवारी दोन ते तीन वेळा खंडित झाला. शिवाय, दुपारी शहराच्या काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर झाला. यामुळे जुने शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आला.