Join us

फेसबुकवर Like सोबतच आता Dislike चा पर्याय ?

By admin | Updated: March 6, 2017 13:58 IST

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आपल्या युजर्सच्या गरजेनुसार एक नवं फीचर आणण्याची तयारी करत आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आपल्या युजर्सच्या गरजेनुसार एक नवं फीचर आणण्याची तयारी करत आहे. युजर्सकडून अनेक दिवसांपासून Dislike पर्यायाची मागणी केली जात आहे. त्यानुसार फेसबुक हे नवं फीचर अॅड करण्याची दाट शक्यता आहे.
 
टेक क्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, या फीचरची चाचणीही फेसबुकने सुरू केली आहे. काही युजर्सच्या अकाउंटवर या फीचरची चाचणी सुरू आहे. फेसबुकवर लाइक, कमेंट्स यासह अनेक पर्याय आहेत. मात्र, अजूनपर्यंत Dislike चा पर्याय देण्यात आलेला नाही. मेसेजेससाठी किंवा मेसेजिंग अॅपमध्ये सर्वप्रथम हे फीचर आणण्याची शक्यता आहे. 
 
हे फीचर कधी आणणार आहे याबाबत अदयाप माहिती मिळालेली नाही. मात्र, चाचणी पूर्ण झाल्यावर युजर्सचा चांगला प्रतिसाद राहिल्यास फेसबुक हे फीचर अॅड करणार आहे.