Join us

गृहनिर्माण संस्थांतील समस्यांवर चर्चासत्र

By admin | Updated: July 20, 2015 23:06 IST

सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यांची कार्यपद्धती, त्यांना भेडसाविणाऱ्या समस्या या संदर्भात येत्या शुक्रवारी (२४ जुलै) प्रभादेवी (मुंबई) येथील रवीन्द्र

मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यांची कार्यपद्धती, त्यांना भेडसाविणाऱ्या समस्या या संदर्भात येत्या शुक्रवारी (२४ जुलै) प्रभादेवी (मुंबई) येथील रवीन्द्र नाट्य मंदीर सभागृहात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वुमन लिगल फोरम फॉर को-आॅपरेटिव्ह सोसायटीज’ आणि महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशन आणि मुंबई डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँक यांच्यावतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. या परिषदेमध्ये गृहनिर्माण संस्थांवरील नियंत्रणाची कार्यकक्षा व निवडणुका इ. विषयांवर चर्चा होईल.