Join us

लालूप्रसाद यादव यांना डिस्चार्ज

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

लालूप्रसाद यादव यांना डिस्चार्ज

लालूप्रसाद यादव यांना डिस्चार्ज
मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास एशियन हार्ट इन्स्टट्यिूटमधून डिस्चार्ज देण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यादव यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र पुढील काही महिने औषधी सुरू राहणार आहेत.
२४ ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यांना एशियन हार्ट इन्स्टट्यिूमध्ये दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र, पुढचे अडीच महिने त्यांना औषधी घ्यावी लागणार आहेत. तसेच त्यांना पुढचे काही महिने दिलेला व्यायाम करावा लागणार आहे, असे डॉ. रमाकांत पांडा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)