Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल वाढविणार डायरेक्ट सेलिंग एजंट नेटवर्क

By admin | Updated: June 12, 2014 00:28 IST

दूरसंचार क्षेत्रात देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) ने आता रिटेल नेटवर्क अधिक सशक्त करण्यासाठी नवी विस्तार संकल्पना हाती घेतली आहे.

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) ने आता रिटेल नेटवर्क अधिक सशक्त करण्यासाठी नवी विस्तार संकल्पना हाती घेतली आहे. बीएसएनएलचे संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत कंपनीची सर्व उत्पादने देशात सर्वदूर पोहोचविण्यासाठी रिटेल जाळ््याची सशक्त उभारणी करायची आहे. ज्यांचे देशभरात नेटवर्क आहे, अशा कंपन्यांना येथे अर्ज करता येईल. कंपनीच्या सर्व जिल्हा कार्यालयात याची सविस्तर माहिती उपलब्ध असून तेथे अर्ज करता येईल. पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्वांना अर्ज करता येईल. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत बीएसएनएलची सर्व उत्पादने तर पोहोचण्यास मदत होणार आहेच, पण नवी रोजगार निर्मितीही होईल, असे मत श्रीवास्तव यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)