Join us

गुगल-फेसबुकचा मातृत्वाला खोडा

By admin | Updated: October 16, 2014 05:53 IST

बुद्धिमान महिलांना कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी अ‍ॅपल व फेसबुक या कंपन्यांनी अनोखे पाऊल उचलले असून, महिला कर्मचा-यांचे गर्भ गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

न्यूयॉर्क : बुद्धिमान महिलांना कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी अ‍ॅपल व फेसबुक या कंपन्यांनी अनोखे पाऊल उचलले असून, महिला कर्मचा-यांचे गर्भ गोठवून सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. काही लोकांच्या मते या कंपन्या महिला कर्मचाऱ्यांना आपला आत्मा विकण्यासाठी प्रेरित करत आहेत. या कंपन्यांच्या प्रवक्त्यांनी एनबीसी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्यांचे गर्भ गोठवून ठेवण्यासाठी पैसे देण्याची प्रक्रिया फेसबुकने सुरू केली असून, अ‍ॅपल ही प्रक्रिया जानेवारीत सुरू करणार आहे. अ‍ॅपल व फेसबुक कंपन्या या योजनेंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना २० हजार डॉलर देतील. दोन्ही कंपन्यांत गर्भधारणेसंदर्भात महिला कर्मचाऱ्यांना असणाऱ्या समस्यांवर उपचार करण्यासाठी तसेच मूल दत्तक घेण्यासाठी आधीपासून पैसे देत असत. फेसबुक नुकतेच बाळ झालेल्या नव्या मातापित्यांना ४ हजार डॉलर देत असे. कर्मचारी आपल्या मर्जीनुसार या पैशाचा वापर करत असत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी महिलांच्या वेतनासंदर्भात अलीकडेच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वाद चालू असताना ही योजना समोर आलेली आहे. महिला कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची मागणी न करता आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा व वेतनवाढीचा प्रश्न व्यवस्थापनावर सोडावा, असे नाडेला यांनी म्हटले होते.गर्भ सुरक्षित ठेवण्याच्या कल्पनेला पाठिंबा देणाऱ्या व एगश्योरन्स डॉट कॉमच्या संस्थापिका ब्रिजिट अ‍ॅडप्स यांच्या मते अत्याधिक कामाची अपेक्षा ठेवणारी, करिअर व मुलांचे पालन एकाच वेळी करणे ही अतिशय कठीण बाब आहे. गर्भ सुरक्षित ठेवण्याच्या या योजनेंतर्गत कंपन्या महिलांत गुंतवणूक करत असून, महिलांना हवे तसे जीवन जगण्यास मदत करत आहे.