नवी दिल्ली : रेल्वे आणि राज्य वाहतूक महामंडळासारख्या मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी (बल्क कन्झ्युमर) डिझेलचे दर १.०९ रुपये प्रती लिटरने कमी करण्यात आले आहेत. कार, ट्रकसारख्या किरकोळ ग्राहकांसाठी मात्र डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.दिल्लीत विक्री होणाऱ्या बल्क डिझेलचे दर ६०.४१ रुपयांवरून ५९.३२ रुपये प्रती लिटरवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय दरकपातीचा हा परिणाम आहे. जानेवारी १३ पासून सरकारने मोठ्या ग्राहकांसाठी डिझेलची विक्री स्वत:कडे ठेवली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}