Join us

नव्या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना ध्यास हवा: देशमुख

By admin | Updated: October 29, 2014 22:37 IST

सोलापूर :

सोलापूर :
देशाच्या जडण?घडणीमध्ये स्थापत्य अभियंत्यांचे योगदान मोठे आहे. यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांनी दिवसेंदिवस अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती घेत त्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. जी. के. देशमुख यांनी केले.
विद्याविकास प्रतिष्ठान संचलित व्ही.व्ही.पी. तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापत्य विभागातर्फे आयोजित अँक्टिव्ह रोड सॉफ्टवेअर कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अँक्टिव्ह रोड सॉफ्टवेअरचे प्रमुख गिरीश आरेकर, सचिव अमोल चव्हाण, संचालक प्रा. रोहन देशमुख, प्राचार्य प्रा. एस. एम. शेख, प्रा. ए. आर. पेटकर उपस्थित होते. शास्त्रीय संशोधनाचा मानवी जीवनात प्रत्यक्ष वापर करण्याचे कार्य अभियांत्रिकी शाखेकडून करण्यात येते. त्यासाठी बदलते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आज स्थापत्य शाखेने लक्षणीय प्रगती केलेली दिसून येते. विशेषत: अनेक धरणे, उड्डाण पूल, इमारती, हमरस्ते तयार करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अँक्टिव्ह रोड सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर रस्ते विकासासाठी प्रभावीपणे होऊ शकतो. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सर्व प्रकारचे रस्ते, राज्य मार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांचा सव्र्हे करणे, डिझायनिंग, प्लॅनिंग, जमिनींचे अचूक क्षेत्रफळ व खोदकाम, बा?वळणाचे सर्वेक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांना ही प्रणाली उपयुक्त असल्याचे अँक्टिव्ह रोड सॉफ्टवेअरचे प्रमुख गिरीश आरेकर यांनी सांगितले. या कार्यशाळेत 200 विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी प्रा. भाग्यर्शी काटकर, प्रा. एम. ए. आरेवाले, प्रा. श्वेता दुर्गे, प्रा. एस. एस. शहा यांनी पर्शिम घेतले.