आझाद पार्क येथे उपमहापौर सिद्दीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण
By admin | Updated: August 16, 2014 23:07 IST
अकोला : स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आझाद पार्क येथे उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर सिद्दीकी यांनी आझाद पार्कवरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहली.
आझाद पार्क येथे उपमहापौर सिद्दीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण
अकोला : स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आझाद पार्क येथे उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपमहापौर सिद्दीकी यांनी आझाद पार्कवरील हुतात्मा स्मारकावर पुष्पांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनहलक कुरेशी, फैय्याजखान, उमरअली, शे.अहमद शे.अब्दुला, मन्नानभाई, उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, क्षेत्रीय अधिकारी जी.एम.पांडे, प्रशासन अधिकारी प्रदीप चौरे, अनवर हुसेन, गजेंद्र ढवळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन देवेंद्र टाले यांनी केले. याप्रसंगी उपमहापौर सिद्दीकी यांनी उपस्थित व अकोलेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. -फोटो-१७सीटीसीएल-६९-