सिद्धेश्वर मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्याची मागणी
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST
सोलापूर: सिद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसराची स्वच्छता राखण्याबाबत विशेषत: लक्ष्मी मंडई येथे असणार्या महाद्वारासमोरील रस्त्यात टाकण्यात येणार्या कचर्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, शौचालये हटविणे, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी संभाजी आरमारने मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे केली आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्याची मागणी
सोलापूर: सिद्धेश्वर देवस्थान मंदिर परिसराची स्वच्छता राखण्याबाबत विशेषत: लक्ष्मी मंडई येथे असणार्या महाद्वारासमोरील रस्त्यात टाकण्यात येणार्या कचर्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, शौचालये हटविणे, भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी संभाजी आरमारने मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे केली आहे.सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी वाढली आहे. फुटपाथावर अतिक्रमण झाल्याने वाहतुकीत अडथळाही येत आहे. लक्ष्मी मंडईच्या द्वाराजवळ भटकी जनावरे फिरत असून, या परिसरात अवैध प्रकारही सुरू आहेत. मंदिर परिसर अस्वच्छ करून दुर्गंधी पसरविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी आरमारने केली आहे. यावेळी संस्थापक र्शीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हाप्रमुख संजय सरवदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपशहरप्रमुख संतोष कदम, निलेश देवकते, अमर गुंड, सुमीत दुधनी, संतोष भोपळे, दत्ता जाधव, अंबादास मोरे, संगप्पा म्याकल, धर्मा सारवाडकर, अमोल कळंब, निखिल वाघमोडे, गणेश कांबळे, दीपक सोमा उपस्थित होते.फोटो ओळी::::::::::::::::::सिद्धेश्वर मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्याबाबत संभाजी आरमारने मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना निवेदन दिले. यावेळी र्शीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, संजय सरवदे, गजानन जमदाडे व पदाधिकारी.