्नगारखेड्यातील दारूची दुकाने हटविण्याची मागणी
By admin | Updated: June 12, 2014 00:23 IST
औरंगाबाद : गारखेड्यात मोठी बाजारपेठ बनली आहे. येथे सदैव वर्दळ असते. याच भागात दारूची दुकानेही थाटली आहेत. दारुडे रात्री या चौकात जमा होऊन एकमेकांशी भांडणे करीत असतात. झिंगलेले काही जण रस्त्यातच पडतात. काही जण तेथेच झोपून जातात. या परिसरात तरुणी व महिलांचाही वावर मोठ्या प्रमाणात असतो. काही दारुडे नशेत या तरुणी व महिलांचा पाठलाग करतात. काही जण शिवीगाळ करतात. दारुड्यांचा उपद्रव वाढला असून, या परिसरातील सर्व देशी-विदेशी दारूच्या दुकानाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवासी अजय चव्हाण, अनिल गवई, आदित्य तीर्थंकर, वैभव सातपुते आदींनी केली आहे.