Join us

थकबाकीची वसुली सक्तीने करा सभासदांची मागणी; सोलापूर सोशल बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

सोलापूर: बँकेचे थकबाकीदार वेळेत कर्ज परतफेड करीत नसल्याने बँकेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, अशा बुडव्या थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करून सक्तीची वसुली करावी, अशी मागणी दि सोलापूर सोशल बँकेच्या सभासदांनी सर्वसाधारण सभेत केली.

दि सोलापूर सोशल बँकेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. व्यवस्थापक शकील पीरजादे यांनी विषयाचे वाचन केले. अँड. बेरिया यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध योजनांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सिकंदर कामतीकर, संचालक मैनोद्दीन शेख, नसीरअहमद खलिफा, म. जाबीर अल्लोळी, अ. रजाक नाडेवाले, म. तौफिक शेख, अल्लाबक्ष मनियार, अलहज मैनोद्दीन हुसेनबाशा शेख, शकील मौलवी, इक्बाल शेख, अ. वहाब जमादार, म. शफी शेख, अखलाक शेख, इनामदार मुस्ताक अहमद, सेवक संचालक खलील अहमद अ. लतिफ कादरी, अ. वहाब शेख उपस्थित होते. संचालक अखलाक शेख यांनी आभार मानले.
फोटो ओळी::::::::::::::::
दि सोलापूर सोशल अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष अँड. यू. एन. बेरिया. यावेळी सिकंदर कामतीकर, संचालक मैनोद्दीन शेख, नसीरअहमद खलिफा, म. जाबीर अल्लोळी, अ. रजाक नाडेवाले, म. तौफिक शेख, अल्लाबक्ष मनियार, अलहज मैनोद्दीन हुसेनबाशा शेख, शकील मौलवी, इक्बाल शेख, अ. वहाब जमादार.