Join us

लग्नसराईच्या मागणीने सोन्याच्या भावात सुधार

By admin | Updated: February 14, 2015 00:56 IST

सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ४० रुपयांनी सुधारून २७,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ४० रुपयांनी सुधारून २७,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात ही तेजी नोंदली गेली आहे. दुसरीकडे औद्योगिक संस्था व नाणे निर्मात्यांची मागणी वधारल्याने चांदीचा भावही ४५० रुपयांनी उंचावून ३८,१०० रुपये प्रतिकिलो झाला.सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांच्या मागणीत तेजी नोंदली गेली. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत आर्थिक वृद्धीदर घटण्याच्या भीतीने सराफा बाजाराला गुंतवणूकदारांनी पसंदी दिली.भारतीय बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.८ टक्क्यांनी वधारून १,२३१.२६ डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही ०.९ टक्क्यांनी वाढून १७.०० डॉलर प्रतिऔंस झाला. तयार चांदीचा भाव ४५० रुपयांच्या सुधारणेसह ३८,१०० रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ४६० रुपयांनी वाढून ३७,६४० रुपये प्रतिकिलो राहिला. तथापि, चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीकरिता ६२,००० रुपये व विक्रीसाठी ६३,००० रुपयांवर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)