Join us  

यंदाच्या दिवाळीत चिनी वस्तूंच्या मागणीत ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:19 PM

जनजागृती : व्यापाऱ्यांनी माल न मागविल्याने स्वदेशी वस्तूंना वाढली मागणी

जळगाव : ‘स्वस्तात मस्त’ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत पसंती दिल्या जाणाºया चिनी वस्तूंना सध्या वाढत जाणारा विरोध व व्यापारी संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे यंदाच्या दिवाळीमध्ये जळगावात चिनी वस्तूंच्या मागणीत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यामध्ये चिनी बनावटीच्या विद्युत रोशणाई (लाईटिंग), पणत्या, फटाके, आकाशकंदील इत्यादी वस्तूंची मागणी घटून भारतीय वस्तूंना पसंती दिल्या गेल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.भारतीय सणवार असो अथवा दैनंदिन वापरात येणाºया वस्तूंची बाजारपेठ गेल्या काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या वस्तूंनी काबीज केली असल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून या चिनी वस्तूंना विरोध वाढू लागला. मात्र तरीही भारतीय वस्तूंच्या तुलनेत या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने त्यांची मागणी कायम असल्याचे बाजाजारपेठेत चित्र होते.यात होळी सणाला वापरात येणाºया पिचकाºया असो की रंग यात जास्त प्रमाण चिनी वस्तूंचेच असते. सोबतच वर्षभर लहान मुलांचे खेळणे आणि दिवाळीमध्येही विद्युत रोशणाई, आकाशकंदील, पणत्या, फटाके यामध्येही चिनी वस्तूंचीच अधिक विक्री होत असे. यामुळे भारतीय बनावटीच्या पणत्या व त्या-त्या भागातील कुंभार बांधवांच्या व्यवसायवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसून आला. सोबतच भारतीय लाईटिंग, आकाशकंदील यांचीही मागणी घटत असे.मात्र गेल्या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन व्यापारी बांधवांनी केले होते. मात्र तोपर्यंत भारतीय बाजारपेठेत चिनी बनावटीच्या वस्तू दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी चिनी वस्तूंची केवळ २० टक्क्यांनी विक्री घटली होती.चिनी वस्तूंची आयात न करण्याचा घेतला निर्णयगेल्या वर्षांचा अनुभव पाहता या वर्षी जुलै महिन्यातच कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) संघटनेने चिनी वस्तूंची आयात न करण्याचा निर्णय घेत तसे आवाहनही व्यापाºयांना केले होते. त्यानुसार मोठ्या व्यापाºयांनीच चिनी वस्तू न मागविल्याने लहान शहरातील किरकोळ व्यापाºयांकडेही तो माल उलपब्ध होऊ शकला नाही. मुंबई येथून हा माल जळगावात येतो. मात्र मुंबईतील व्यापाºयांनीच तो न मागविल्याने जळगावातही व्यापाºयांनी आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय वस्तू उपलब्ध करून दिल्या.‘वापरा आणि फेका’पेक्षा टिकाऊला पसंतीचिनी बनावटीच्या वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांची कोणतीही शाश्वती (वारंटी, गॅरंटी) दिली जात नाही. त्यामुळे त्या एकदा वापरा व फेका अशाच त्या वस्तू असल्याचे नागरिकांनाही समजू लागल्याने वारंवार खर्च करण्यापेक्षा एकदाच खर्च करून टिकाऊ वस्तूंना पसंती दिली जात असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.चिनी बनावटीचे फटाके दोन वर्षापासूनच बंदफटाक्यांमध्येही चिनी बनावटीच्या फटाक्यांचे मोठे प्रमाण असे. मात्र दोन वर्षांपासून चिनी फटाके विक्री न करण्याचा निर्णय जळगाव डिस्ट्रीक्ट फायर वर्क्स असोसिएशनने घेतल्याने जळगावात या फटाक्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात आले.चिनी वस्तू मुक्त होणार बाजारपेठयंदा चिनी वस्तूंची विक्री ४० टक्क्यांनी घटल्याचे प्रमाण असले तरी ते पुढील वर्षापर्यंत हे प्रमाण १०० टक्के होऊन बाजारपेठ चिनी वस्तू मुक्त होऊ शकेल, असा विश्वास कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या (कैट) राज्य संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी यांनी व्यक्त केला. यंदा गेल्या वर्षीचा माल शिल्लक असल्याचे मागणी घटल्याचे हे प्रमाण सध्या केवळ ४० टक्के दिसत असले तरी आता चिनी मालच आणला जाणार नसल्याने हे प्रमाण वाढणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :व्यवसायजळगाव