Join us

याेजनांना विलंब, खर्चात साडेचार लाख काेटींची वाढ; फटका सर्वसामान्यांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 08:23 IST

अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे.

 नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या याेजनांना विलंब झाला असून परिणामी त्यांचा खर्च ४.५२ लाख काेटी रुपयांनी वाढला आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती समाेर आली आहे.  विलंब झाल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.अहवालामध्ये १५० काेटी रुपयांचे लागत मूल्य असलेल्या कंपन्यांचा आढावा घेण्यात आला. त्यात  १ हजार ५२९ याेजनांचा समावेश आहे. त्यापैकी ३८४ याेजनांना विलंब झाला असून त्यांच्यावरील खर्च मूळ किमतीपेक्षा माेठ्या प्रमाणात वाढला आहे. 

यामुळे उशीर भूमि अधिग्रहण, वन व पर्यावरण विभागांची मंजुरी, काेराेना महामारी इत्यादी कारणांमुळे बहुतांश याेजनांना विलंब झाल्याचे अहवालात म्हटले. सरासरी ४२ महिन्याचा विलंब प्रत्येक याेजनेला हाेत आहे.

टॅग्स :व्यवसाय