Join us

हलक्या हेलिकॉप्टरसंबंधी सहा हजार कोटींच्या निविदा रद्द संरक्षण मंत्रालयाचा निर्णय : १७,५०० कोटींच्या अन्य प्रस्तावांना मंजुरी

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

नवी दिल्ली : लष्कर आणि वायूदलासाठी खरेदी केल्या जाणार्‍या १९७ हलक्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसंबंधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा संरक्षण मंत्रालयाने रद्द केल्या आहेत. चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा नवे हेलिकॉप्टर घेणार होते. सियाचीनसारख्या उंच पर्वतीय भागात लष्कर आणि सामग्रीची हालचाल करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार होता.

नवी दिल्ली : लष्कर आणि वायूदलासाठी खरेदी केल्या जाणार्‍या १९७ हलक्या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसंबंधी घोटाळ्याचा आरोप असलेल्या सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा संरक्षण मंत्रालयाने रद्द केल्या आहेत. चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा नवे हेलिकॉप्टर घेणार होते. सियाचीनसारख्या उंच पर्वतीय भागात लष्कर आणि सामग्रीची हालचाल करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार होता.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेच्या बैठकीत १७,५०० कोटी रुपयांच्या अन्य काही सौद्यांना मंजुरीही देण्यात आली. आयुष्य संपत असलेल्या पाणबुड्यांच्या मध्यंतरीच्या काळातील अत्याधुनिकीकरणासाठी ४८०० कोटी रुपयांच्या खर्चाला तसेच ११८ अर्जुन-२ रणगाड्यांच्या खरेदीसाठी ६६०० कोटी रुपयांच्या सौद्यावर परिषदेने मोहोर उमटवली.
-----------------
देशांतर्गत संरक्षण
उद्योगाला चांगले दिवस
रालोआ सरकारने स्वदेशी उद्योग विकसित करण्याचे धोरण आखले असून या निर्णयामुळे स्थानिक संरक्षण उद्योगाला चार लाख कोटींचा व्यवसाय अपेक्षित आहे. सशस्त्र दलांसाठी ४०० हेलिकॉप्टर तयार करण्याची संधी भारतीय उद्योगाला देण्याच्या उद्देशाने परिषदेेने १९७ हेलिकॉप्टरच्या खरेदीचा सौदा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
-----------------
दुसर्‍यांदा निविदा रद्द
गेल्या सात वर्षांत निविदा रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. युरोपियन युरोकॉप्टर आणि रशियन कामोव्ह या दोन कंपन्या स्पर्धेत होत्या. सीबीआयचा तपास आणि अन्य आरोपांबाबत असलेले खटले पाहता हा सौदा दोन वर्षांपासून रोखण्यात आला होता. अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात एका ब्रिगेडियरने अँग्लो-इटालियन कंपनीकडून ३० कोटींची लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आला होता. पहिल्याच फेरीत अगुस्टाचा पत्ता साफ झाल्यानंतर केवळ सदर दोन कंपन्या स्पर्धेत उरल्या होत्या. घोटाळ्याच्या आरोपानंतर याआधी २००७ मध्ये निविदा रद्द करण्यात आल्या होत्या.
------------------------
मंजूर प्रस्ताव....
४० अर्जुन रणगाड्यांची चेसिस आर्टिलरी सिस्टिम- किंमत ८२० कोटी रुपये.
चीन सीमेवर मोबाईल दळणवळण यंत्रणा उभारण्याला मंजुरी.
नौदलासाठी १६ बहुआयामी हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी निविदा काढण्याला मंजुरी.
अमेरिकेकडून १५ चिणूक आणि २२ ॲपाची लढाऊ हेलिकॉप्टर खरेदीसाठी दीड लाख कोटींच्या सौद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही हिरवी झेंडी.
स्वदेशी प्रकल्प ७ ए आणि प्रकल्प १५ बी अंतर्गत नौदलाच्या पाणबुडीभेदी युद्धनौकेच्या
उभारणीसाठी १७०० कोटींचे प्रस्ताव.