Join us
Daily Top 2Weekly Top 5

दावोस परिषदेला जाणार दीपिका पदुकोण, शंभरहून अधिक भारतीय कंपन्यांचे सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 04:39 IST

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.

पुणे : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. येत्या जानेवारीत होणाऱ्या या परिषदेला शंभरपेक्षा अधिक भारतीय कंपन्यांचे सीईओ आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह अनेक बॉलिवूड तारे-तारका याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. स्वित्झर्र्लंडमधील दावोस शहरातील स्वीस स्काय रिसॉर्ट येथे जानेवारी २०२० मध्ये ही परिषद होत आहे. यामध्ये संपूर्ण जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली काही नेतेदेखील उपस्थित राहणार असून, या परिषदेत ‘संलग्न आणि शाश्वत जग’ या प्रामुख्याने जगाला अपेक्षित असणाºया विषयावर चर्चा, मांडणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.