Join us
Daily Top 2Weekly Top 5

शहीद निमकंडे यांच्या स्मारकावर दीप प्रज्वलन

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST

स्लग: ज्युनिअर रेडक्रॉस सोसायटीचा उपक्रम

स्लग: ज्युनिअर रेडक्रॉस सोसायटीचा उपक्रम
शिर्ला: देशाच्या सीमेवर लढणार्‍या शिर्ला येथील भारतीय लष्करातील जवानांच्या घरांसमोर रांगोळी काढून, सदैव दीप प्रज्वलित करण्याचा अनोखा उपक्रम ज्युनिअर रेडक्रॉस सोसायटी अकोला यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविला. या उपक्रमांतर्गत येथील शहीद कैलास निमकंडे यांच्या स्मारकासमोर दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी निकमंडे यांच्या कुटुंबीयांनी कथन केलेल्या रोमहर्षक अनुभवाने उपस्थित विद्यार्थी प्रेरित झाले. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी सैन्यात जाण्याचा मनोदय व्यक्त केला. शहीद स्मारकासमोर शहीद कैलास निमकंडे यांच्या आई मंदाताई निमकंडे व वडील काशीराम निमकंडे यांचा ज्युनिअर रेडक्रॉस सोसायटीच्या समन्वयक कीर्ती मित्रा व एन.सी.सी. अधिकारी हेमंत ओझरकर यांनी सन्मान केला. यावेळी विज्ञान रेलकर, माधव मुनशी, कुशल भिडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जवान वीरेंद्र गवई, देवीदास निमकंडे, शकुंतलाबाई निमकंडे, सुनील निमकंडे, विद्या निमकंडे, अर्चना निमकंडे यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूलचे एन.सी.सी. कॅडेट उपस्थित होते. (वार्ताहर)18सीटीसीए03