Join us

चीनच्या विदेश व्यापारात घट

By admin | Updated: December 8, 2015 23:41 IST

चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते

बीजिंग : चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते. नोव्हेंबरमध्ये चीनच्या विदेश व्यापारात मागील वर्षाच्या तुलनेत ४.५ टक्के घट झाली. या अवधीत चीनचा विदेश व्यापाराचा आकडा ३३७ अब्ज डॉलरवर आला.या अवधीत ३.७ टक्के घट झाल्याने चीनचा निर्यात व्यापार १,२५० अब्ज युआन आणि आयात व्यापार ५.६ टक्क्यांनी कमी होत ९१० अब्ज युआन इतका झाला. त्यामुळे एकूण व्यापारातील तूट वाढून ३४३.१ अब्ज युआनवर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार वर्षाच्या सुरुवातीच्या ११ महिन्यांत वार्षिक आधारावर विदेश व्यापारात ७.८ टक्के घट झाली. या अवधीत चीनचा विदेश व्यापार २२,०८० युआन एवढा झाला.