Join us

१३ टक्क्यांनी घटली निर्यात

By admin | Updated: January 8, 2016 03:02 IST

जागतिक पातळीवर घटलेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात १३ टक्क्यांनी घटून

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर घटलेली मागणी आणि कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षात देशाची निर्यात १३ टक्क्यांनी घटून २७० अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये निर्यात ३१०.५ अब्ज डॉलरची होती.प्राप्त माहितीनुसार वाणिज्य सचिव रीता तेवतिया यांनी सीआयआय व फिक्की आदी उद्योग मंडळांबरोबर घेतलेल्या बैठकीत म्हटले आहे की, देशाची निर्यात चालू आर्थिक वर्षात २७० अब्ज डॉलरपेक्षा पुढे जाण्याची शक्यता नाही. निर्यातदारांची संघटना फेडरेशन आॅफ एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशननुसार (फियो) आर्थिक वर्ष २००८-२००९ मध्ये देशाची निर्यात २७० अब्ज डॉलरपेक्षा कमी २१० अब्ज डॉलर झाली होती.