Join us
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक घसरणीने सोन्याचा भाव घटला

By admin | Updated: December 6, 2014 01:49 IST

औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी घटून ३६,९०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर संकेतांच्या पार्श्वभूमीवर मागणी घटल्याने शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ३० रुपयांच्या किरकोळ घसरणीसह २६,८७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीचा भावही १०० रुपयांनी घटून ३६,९०० रुपये प्रतिकिलोवर राहिला.आभूषण निर्मात्यांची देशांतर्गत बाजारात मागणी घटल्याचा या मौल्यवान धातूंवर दबाव राहिला. जाणकारांनी सांगितले की, जागतिक बाजारात दर घटल्याचाही स्थानिक बाजारावर परिणाम झाला. अमेरिकेत रोजगार निर्मितीची आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी जागतिक बाजारात सोन्याचा भाव घसरला. अमेरिकेत रोजगार संधी वाढतील, असे मानले जात असून यामुळे अर्थव्यवस्थेवरील कर्जभार वाढण्याची शक्यता आहे.देशांतर्गत बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापुरात सोन्याचा भाव ०.३ टक्क्यांनी घटून १२०१.८१ डॉलर व चांदीचा भाव ०.२ टक्क्यांनी कमी होऊन १६.४३ डॉलर प्रतिऔंस राहिला. तयार चांदीचा भाव १०० रुपयांनी घटून ३६,९०० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १५० रुपयांनी स्वस्त होऊन ३६,५०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६१,००० रुपये व विक्रीकरिता ६२,००० रुपये प्रतिशेकड्यावर स्थिर राहिला.