Join us
Daily Top 2Weekly Top 5

परकीय चलन गंगाजळीमध्ये घट

By admin | Updated: June 9, 2014 04:38 IST

काही सप्ताह सातत्याने वाढ दिल्यानंतर देशाच्या परकीय चलन गंगाजळीत मे महिन्याच्या अखेरीस देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये घट झाली

मुंबई : काही सप्ताह सातत्याने वाढ दिल्यानंतर देशाच्या परकीय चलन गंगाजळीत मे महिन्याच्या अखेरीस देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये घट झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस परकीय चलन गंगाजळीत ३१२ अब्ज डॉलर शिल्लक होते.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या माहितीनुसार ३० मे रोजी संपलेल्या सप्ताहात देशाची परकीय चलन गंगाजळी २७.३८ कोटी डॉलरने कमी झाली असून ती ३१२.३८२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या काळात देशातील सोन्याचा साठा २० हजार ९६५ अब्ज डॉलरवर स्थिर असल्याचेही बॅँकेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. सोन्याची आयात कमी झाल्याने भारताचा व्यापारी तोटा काही प्रमाणात घटला आहे. (प्रतिनिधी)