Join us

कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट

By admin | Updated: December 23, 2015 02:16 IST

देशात कच्च्या तेलाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांनी घटले. या दरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादनातही घट झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कच्च्या तेलाचे उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.३ टक्क्यांनी घटले. या दरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादनातही घट झाली आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, गेल्या नोव्हेंबरमध्ये तेलाचे उत्पादन ३.३ टक्क्यांनी घटून ३०.४ लाख टन झाले. ते वर्षभरापूर्वी ३१.५ लाख टन होते. सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसीच्या उत्पादनातही या दरम्यान १.३ टक्के घट होऊन ते १८.४ लाख टन झाले. आॅईल इंडियाचे उत्पादन ७.१८ टक्क्यांनी घटून २,६४,८७८ टन झाले. खासगी कंपन्यांच्या उत्पादनात याच कालावधीत सहा टक्क्यांनी घट होऊन ते ९,३६,६४७ टन झाले.