Join us
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या तेलाबाबत लवकरच निर्णय

By admin | Updated: February 16, 2016 03:20 IST

पेट्रोलियम मंत्रालय लवकरच कच्या तेलाच्या आयात धोरणासंदर्भात मंत्रिमंडळाची टिपणी जारी करणार आहे. त्यातून देशाला निविदा मागविण्याच्या कामातून सुटका

मुंबई : पेट्रोलियम मंत्रालय लवकरच कच्या तेलाच्या आयात धोरणासंदर्भात मंत्रिमंडळाची टिपणी जारी करणार आहे. त्यातून देशाला निविदा मागविण्याच्या कामातून सुटका होईल व जागेवरच खरेदीची सवलत घेता येईल, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.येथे मेक इन इंडियाच्या कार्यक्रमासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कच्चे तेल आयात करणारा भारत तिसरा सर्वात मोठा देश असूनही अद्यापही निविदा प्रक्रियेतून ही खरेदी होते. मात्र आता ही प्रक्रिया समाप्त करण्यात येईल, असेही ते म्हणाले.