Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीएफवर कर लावण्याचा निर्णय रद्द

By admin | Updated: March 1, 2016 12:21 IST

सरकारने भविष्य निर्वाह निधी काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १ - सरकारने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी लावण्याचा निर्णय मागे घेतला आहे.  पीएफची रक्कम कर कक्षेत आणण्याची सूचना काल सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली. मात्र जनतेच्या नाराजीमुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. ४० टक्यांहून जास्त भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढणा-यांवर कर लागू करण्याचा हा प्रस्ताव होता. 
महसूल सचिव हसमुख अधिया यांनी भविष्य निर्वाह निधी (पीएफ)  काढताना कोणताही कर लागणार नसल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम कर कक्षेत आणण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार येत्या १ एप्रिल २०१६ पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढताना ठराविक रक्कमेवर कर आकारणी करण्यात येणार होती.