Join us

इंधन दरवाढीमुळे कर्जेही महागणार, पतधोरण बैठकीत चर्चा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:27 IST

इंधन दरवाढीमुळे रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत गांभिर्याने विचार करीत आहे. यासंबंधी पतधोरण समितीच्या बैठकीत खूप विचारविनिमय करण्यात आला. बैठकीच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी पतधोरण जाहीर करताना बँक रेपो दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई : इंधन दरवाढीमुळे रिझर्व्ह बँक रेपो दराबाबत गांभिर्याने विचार करीत आहे. यासंबंधी पतधोरण समितीच्या बैठकीत खूप विचारविनिमय करण्यात आला. बैठकीच्या अखेरच्या दिवशी, बुधवारी पतधोरण जाहीर करताना बँक रेपो दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजाला ‘रेपो दर’ म्हटले जाते. हा दर सध्या ६ टक्के आहे. ‘मेक इन इंडिया’साठी हा दर कमी करुन उद्योगांना अधिकाधिक कर्ज मिळावे, यासाठी सरकारकडून सातत्याने बँकेवर दबाव येत असतानाही आॅक्टोबरपासून या दरात घट झालेली नाही. आता बुधवार, ६ जून रोजी जाहिर होणाºया पतधोरणात तर रिझर्व्ह बँक हा दर वाढविण्याच्या विचारात आहे. द्वैमासिक पतधोरण तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची बैठक सोमवारपासून सुरू झाली. दुसºया दिवशी प्रामुख्याने महागाईवरचर्चा झाली.वैयक्तिक कर्ज महागणार?वैयक्तिक कर्जे हे सहसा महागाई वाढविणारे असतात. ही कर्जे जेवढी स्वस्त तेवढा बाजारात अधिक पैसा येतो व त्यातून महागाई वाढते. हे रोखण्यासाठीच रिझर्व्ह बँक रेपो दरात पाव टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. रेपो दर पाव टक्का वाढल्यास बँका कर्जावरील व्याजदरात खर्चासह ०.४० टक्क्यांपर्यंत वाढ करतात. तसे झाल्यास वैयक्तिक कर्जाच्या मासिक हप्त्यात लाखामागे ८० ते १०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.पुढील धोरणातही वाढ शक्यरिझर्व्ह बँकेने याआधी ६ एप्रिलला पतधोरण जाहीर केले. यावेळी खनिज तेल ६७ ते ६९ डॉलर प्रति बॅरलदरम्यान होते. ते आता ७५-७७ डॉलरवर गेले आहेत. पण मागील आठवडाभरात त्यात पुन्हा किंचित घट झाली. त्यामुळे या पतधोरणात दर तसेच ठेऊन इंधन महागल्यास आॅगस्ट महिन्यात व्याजदरात वाढ केली जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.गृह कर्जे आधीच महागलेलीरिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढीची चिन्हे असल्याने बँकांनी गृह कर्जे आधीच महाग केली. स्टेट बँक, पीएनबी, एचडीएफसी, आयडीबीआय, कोटक महिंद्रा आदी बहुतांश बँकांनी कर्जाच्या व्याजदरात मागील आठवड्यातच ०.१० टक्के वाढ केली आहे.- भडकलेल्या इंधनाच्या दरांनी महागाई वाढविल्याने बैठकीत उपस्थित असलेले बँकेचे अधिकारी रेपो दरात वाढ करण्यासाठी आग्रही होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक